जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) हे गेल्या ५ वर्षापासून माझ्यासोबत फ़िरत होते. त्यातले ४ वर्ष ११ महिने त्यांना समजले नाही मी मुंबईचा आहे. आज त्यांना समजले. माझ्यावर टीका केल्याशिवाय गुलाबराव पाटलांना मंत्रीपद मिळणार नाही म्हणून ते असे काहीतरी बोलत आहेत, असा टोला शिवसेना (Shivsena) जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी लगावला आहे.
जळगावातील काही युवा सेना पदाधिकारी यांनी राजीनामा दिल्यावर आ.गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यावर टीका करीत, सावंत मुंबईचा माणूस असून जळगावच्या ४८ डिग्री तापमानाचे त्यांना काय कळणार? कार्यकर्ते जपावे लागतात. संजय सावंत यांनी साधी ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी, असे आवाहन आ.पाटील यांनी केले.