Pachora : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार; तिघांवर गुन्हा

जानेवारी 22, 2026 4:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच जळगावच्या पाचोरामधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून तिच्यावर वेळोवेळी आळीपाळीने अत्याचार केला. याप्रकरणी तिघांवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला असून यातील दोन नराधमांना तातडीने अटक केली आहे.

crime 1 jpg webp

नेमकी घटना काय?
मे २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत काकणबर्डी परिसर आणि अंतुली रोडवरील शेतात ही घटना घडली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपी पवन संजय परदेशी आणि प्रथमेश पाटील (दोघे रा. पाचोरा) यांनी तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीपोटी पीडितेवर आरोपींनी वेळोवेळी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. याशिवाय, तिसरा आरोपी विकी शिवाजी राजपूत याने पीडितेचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Advertisements

याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. पवन परदेशी आणि प्रथमेश पाटील या दोन संशयित नराधमांना अटक करण्यात आली आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now