जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । पोलीसात तक्रार दिल्याच्या कारणावरून तरूणीला मारहाण करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार अमळनेर येथील एका भागात घडला. या प्रकरणी एकाविरोधात येथील पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणारी तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता तरूणी ही आपल्या कुटुंबियांसोबत अंगणात गप्पा मारत होत्या. दरम्यान पोलीसात तक्रार दिल्याच्या कारणावरून संशयित आरोपी नरेंद्र नाना चौधरी याने तरूणीला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच तिच्या छातीवर हात ठेवून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. याप्रकरणी तरूणीच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी नरेंद्र चौधरी करीत आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल महाजन करीत आहे.