जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२२ । सावदा शहरातील इतेहाद एज्युकेशन सोयायटीतील संस्थेच सचिवांसह चेअरमन व जि.प.शिक्षकांनी अन्य संशयीतांनी बनावट शिक्षक भरती प्रस्ताव तयार केल्यानंतर त्यास तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी व माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यांनी मान्यता देवून मूळ प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने उभयंतांविरोधात बुधवार, 11 रोजी शेख हारून शेख इकबाल यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याने शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयीत शेख हनीफ शेख रशीद मन्सुरी यास अटक केली आहे.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
शेख हारून शेख इकबाल यांच्या फिर्यादीनुसार, सन 2019 ते 11 मे 2022 दरम्यान इतेहाद एज्युकेशन सोयायटी, सावदा येथे संस्थेचे सचिव शेख सुपडू शेख रशीद मन्सुरी (इंदिरा गांधी चौक, सावदा), जि.प.शिक्षक शेख हनिफ शेख रशीद मन्सुरी, स्कूल कमिटी चेअरमन सगीर दगडू बागवान (सध्या मयत), मुक्तार अली कादरअली (ऑटोनगर, जळगाव), लुकमान खान गुलशेर खान (रा.मु.पो.अंबाडी, ता.पाळा, जि.पालघर), शेख रफिक शेख गुलाब (रा.जमादारवाडा, सावदा) यांनी संगणमत करीत बोगस शिक्षक नामे शेख दानिश शेख सगीर बागबान, शेख सलीम अहमद शेख सुपडू पिंजारी, शेख जब्बार शेख सलीम कुरेशी यांचा बोगस शिक्षक भरतीचा प्रस्ताव तयार केला व तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्कर जे.पाटील यांनी बनावट प्रस्तावाला मान्यता दिली व माध्यमिक उपशिक्षण अधिकारी देवांग (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याकडे चौकशी असताना पूर्ण प्रकरण बोगस असल्याचे दिसत असतानादेखील त्यांनी जाणीवपूर्वक कुठलीही दखल घेतली नाही.
संशयीतांनी शासन व विद्यार्थ्यांनी फौजदारी पात्र कट रचत फसवणूक केल्यानंतर भादंवि कलम 420, 406, 465, 466, 467, 471, 120 (ब), 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, हवालदार महेमूद शहा व सहकारी करीत आहे.