---Advertisement---
जळगाव जिल्हा आरोग्य कृषी चाळीसगाव विशेष

अरे देवा…जळगावात गाई, म्हशी, बैलांचा होतोय मृत्यू; वाचा सविस्तर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ सप्टेंबर २०२३ | देशात पशुपालन हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा जोडधंदा मानला जातो. गाई-म्हशी शेतकरी वर्गाचे उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, त्यावर सध्या लम्पी नावाच्या संसर्गजन्य रोगाने ग्रहण लागले आहे. लम्पीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या आजारामुळे जानावरांच्या शरिराला गाठी येतात, जळगाव जिल्ह्यात हा व्हायरस खुप वेगाने पसरत आहे. लम्पी आजाराने जिल्ह्यात आतापर्यंत १९७ जनावरांचे बळी घेतले आहेत. आतापर्यंत २६३७ पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे.

lumpy jpg webp webp

चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव आणि एरंडोल या तालुक्यात बाधीत जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९७ जनावरे दगावली असून त्यात ११२ जनावरे एकट्या चाळीसगाव तालुक्यातील आहेत. दुसरीकडे मुक्ताईनगर,भुसावळ, बोदवड व यावल तालुक्यात एकही जनावर बाधीत नाही. लम्पीच्या संक्रमणामुळे सुरुवातीला जिल्ह्यातील ७ पशुधनांचा आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. आता मात्र जिल्ह्यातील सर्वच आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत.

---Advertisement---

तालुकानिहाय जनावरांचा मृत्यू

जळगाव-०२
पाचोरा-२२
अमळनेर-०४
एरंडोल-१८
चाळीसगाव-११२
जामनेर-०१
भडगाव-१९
चोपडा-०१
रावेर-००
धरणगाव-०४
पारोळा-१४

काय आहे लम्पी व्हायरस

लम्पी हा त्वचाचा रोग आहे, यामुळे जनावरांच्या शरिराला गाठी येतात आणि पुढे त्या गाठींचा आकार मोठी होतो. हा व्हायरस जास्त वेगाने दुसऱ्या जनावरांमध्ये संक्रमीत होतो. लम्पी या आजाराच्या लक्षणांमध्ये प्रथम जनावरांना ताप येतो. त्यांचे वजन कमी होते, जनावरांच्या डोळ्यातून चिकट पाणी टिपकते, तोंडातून लाळ पडते, शरिरावर छोट्या गाठी यायला लागतात. जानावर दूध कमी देते, यामुळे जनावरांची तब्येत जास्त खराब होते.

लम्पी व्हायरसवर उपाय

लम्पीची लागण झालेल्या जनानरांना वेगळे ठेवा.
संपुर्ण गोठ्यात कीटकनाशक फवारावे.
माश्या, डास, गोचीड यांना मारून टाका.
जनावराचा मृत्यु झाल्यास मृतदेह जमीती पुरा.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---