⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | कोरोना | काय सांगता.. व्हॉट्सॲपद्वारे नोंदवू शकता कोविड लसचा स्लॉट

काय सांगता.. व्हॉट्सॲपद्वारे नोंदवू शकता कोविड लसचा स्लॉट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २५ ऑगस्ट २०२१ | कोविड लसीकरण संदर्भात शासनाकडून दिवसेंदिवस नवनवीन प्रणालीचा उपयोग करण्यात येत आहे. आता कोविड लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग करताना तुम्ही व्हॉट्सॲपचा देखील उपयोग होऊ शकतो.

आरोग्य मंत्रालय आणि MyGov नुसार, जवळचे लसीकरण केंद्र शोधण्यासाठी आणि आपला व्हॅक्सीन स्लॉट बुक करण्याचे काम तुम्ही व्हॉट्सअपद्वारे (WhatsApp) सुद्धा सहज करू शकणार आहेत. यासाठी काही नंबर जारी करण्यात आले आहेत. MyGovIndia च्या ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे.

नागरिकांची गैरसोय टाळणार
माय जीओव्हीचे सीएओ आणि NeGD चे अध्यक्ष अभिषेक सिंह यांनी म्हटले की, लसीकरण प्रमाणपत्र सुद्धा व्हॉट्सअपवर डाऊनलोड करता येईल. आता लोकांना व्हॉट्सअपवर AI-आधारित इंटरफेसला नेव्हिगेट करणे सोपे वाटते आहे. चॅटबोटची प्रत्यक्ष क्षमता अनलॉक होणार असून ती व्हॉट्सॲपला उपलब्ध होणार आहे.


व्हॉट्सअपद्वारे असा बुक करा स्लॉट

– कॉन्टॅक्ट लिस्टच्या रूपात MyGov कोरोना हेल्पडेस्क 9013151515 नंबर नोंदवा.

– आपल्या व्हॉट्सअपवरून या नंबरवर Book Slot लिहून पाठवा.

– एसएमएसच्या माध्यमातून प्राप्त झालेला 6 अंकाचा ओटीपी नोंदवा.

– व्हॉट्सअप चॅटमध्ये आपल्या पसंतीची तारीख, ठिकाण, आधार, पिनकोड आणि व्हॅक्सीन प्रकार निवडा.

– स्लॉट प्राप्त करा आणि ठरलेल्या दिवशी लसीकरण केंद्रावर जा.

व्हॉट्सॲपवर मिळवा व्हॅक्सीन प्रमाणपत्र
– आपल्या मोबाईलमध्ये +91 9013151515 हा क्रमांक सेव्ह करा.

– व्हॉट्सअपवर ‘कोविड सर्टिफिकेट’ टाईप करा आणि पाठवा.

– ओटीपी नोंदवा.

– प्रमाणपत्र डाऊनलोड करा.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.