⁠ 
रविवार, मे 5, 2024

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तारांना धक्का ; न्यायालयाकडून फौजदारी खटला चालवण्याचे आदेश..

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२३ । राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून सिल्लोडच्या न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिले आहे.

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात मालमत्तेसंबंधी माहितीत तफावत आढळून आली. निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल सत्तार यांनी निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रात चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. एकच जमीन 2014 च्या शपथपत्रात त्यांनी खरेदी केलेली दिसली. 2019 च्या प्रतिज्ञापत्रात त्याच जमिनीची अधिकची किंमत दाखवण्यात आली. अशा एकूण 4 ते 5 मालमत्तांच्या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीमध्ये फरक असल्याचे न्यायालयाच्या तपासादरम्यान निदर्शनास आले.

त्यामुळे सिल्लोड न्यायालयाने या प्रकरणी खटला चालवण्याचे आदेश दिले असून त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला.