बातम्या

अमिषा पटेलविरुद्ध वॉरंट जारी, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल अडचणीत कचाट्यात सापडली आहे. कारण मुरादाबाद स्थित एका इव्हेंट अमिषा पटेलसह तिच्या तीन सहकाऱ्यांवर ११ लाख रुपये घेऊनही २०१७ मध्ये एका लग्नाला उपस्थित न राहिल्याचा आरोप केला. अमिषाने १९ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्यास नकार दिल्यानंतर मुरादाबाद न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले असून तिला २२ ऑगस्टला हजर व्हायचे सांगितले आहे.

मुरादाबादमध्ये ड्रीम व्हिजन नावाची इव्हेंट कंपनी चालवणाऱ्या पवन वर्माने आरोप केला की, १६ नोव्हेंबर २०१७ रोजी अमीषा एका लग्नात परफॉर्म करणार होती, त्यासाठी तिने ११ लाख रुपये आगाऊ घेतले होते. अभिनेत्री दिल्लीत आली होती, पण दिल्ली ते मुरादाबादमधील अंतर जास्त आहे असं सांगून तिने ११ लाख रुपयांव्यतिरिक्त २ लाख रुपये अधिक मागितले. कार्यक्रमाच्या आयोजकांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर अमिषा कोणतीही सूचना न देता परतली.

मुरादाबादस्थित एका इव्हेंट कंपनीने अमिषा आणि तिच्या तीन साथीदारांवर आरोप केले आहेत, ज्यात राजकुमार गोस्वामी, अहमद शरीफ यांचा समावेश आहे. तिने आजपर्यंत पैसे परत केले नसल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. ड्रीम व्हिजन कंपनीचे मालक पवन वर्मा यांनी अमिषा आणि इतर तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने अमिषा आणि इतर आरोपींना २२ ऑगस्टला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

अमिषावर कलमे
अमिषा पटेल आणि तिचे सहकारी सुरेश कुमार, राजकुमार गोस्वामी, अहमद शरीफ यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहेत. या अभिनेत्रीवर आयपीसी कलम १२० ब, ४०६, ५०४, ४२० आणि ५०६ अंतर्गत मुरादाबाद न्यायालयात खटला सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button