सीसीआयच्या एन्ट्री’ने कापसाचा भाव घसरला; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

जानेवारी 30, 2026 4:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । काही दिवसापूर्वी कापसाच्या दरात वाढ दिसून आली. मात्र ‘सीसीआय’ने चालू हंगामातील गाठी खुल्या बाजारात विक्रीसाठी काढल्यामुळे खासगी बाजारात मध्यंतरी वधारलेले कापसाचे दर आता काही प्रमाणात खाली आले आहेत. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

cotton market jpg webp

जानेवारी महिन्याच्या सुरुवातील कापसाचे दर ७,६०० ते ७,८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. मात्र, सीसीआयने आपल्याकडील मालाची आता विक्री सुरू करताच हे दर आता खाली आले आहेत. सध्या सरासरी दर ७,४०० ते ७,५०० दर मिळत आहे.

शेतकऱ्यांकडे अजूनही काही प्रमाणात कापूस शिल्लक आहे. भाव पुन्हा ८ हजार रुपयांचा टप्पा ओलांडतील, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी काढलेला नाही. मात्र, दुसरीकडे सीसीआयचा माल बाजारात आल्याने आगामी काळात कॉटन बाजार नेमका कोणत्या दिशेला जाईल, याबाबत तज्ज्ञांमध्येही संभ्रम कायम आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now