Cotton News : कापसाच्या प्रश्नावर मंत्री गिरीश महाजनांनी सोडले मौन, म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२३ । जिल्ह्यातील व राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याच्या तक्रारी कित्येकदा शेतकरी करत आहेत. गेल्या वर्षी १२ हजार भाव मिळत असतांना यंदा शेतकऱ्यांना केवळ सात ते आठ हजार पर्यंत भाव मिळत आहे. मात्र याबाबत सरकार उदासीन असल्याचे पाहायला मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याचे उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या भाव वाढीबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

जळगाव येथे बोलत असतांना गिरीश महाजन म्हणाले कि, कापसाला ७७०० -७८०० रुपये भाव मिळत आहे. एकेकाळी हाच भाव बारा हजार रुपये पर्यंत गेला होता. यामुळे शेतकऱ्यांना मिळत असलेला भाव हा अतिशय कमी असून यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांचे इतर खर्च हि निघत नाहीयेत. यात कोणाचाही दुमत नाही. राज्य शासन शेतकऱ्यांच्या सोबत ठामपणे उभा असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा हिताचे निर्णय शासन घेईल अशी अपेक्षा आहे.

यापुढे बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारभाव वाढल्याने संपूर्ण देशामध्ये गॅस सिलेंडरचे भावही वाढवण्यात आले आहेत. महागाई वाढण्याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेले बदल. यामुळे निश्चितच लवकरच जसे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव कमी होतील तसेच देशातल्या इंधनाचे भावही कमी होतील.