Cotton News : भाव मिळत नाही म्हणून कापूस ठेवला घरात अन आता आलं नवं संकट

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२३ । जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याची अवस्था आता इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच झाली आहे. कारण शेतकऱ्यांनी भाव मिळत नाही म्हणून एकीकडे कापूस घरात साठवून ठेवला आहे तर दुसरीकडे. घरात साठविलेल्या कापसाला आता कीड लागून कापसाचे वजनही कमी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा तडाका वाढल्याने कापूस पूर्णता कोरडा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांने करावं तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अधिक माहिती अशी कि, जिल्ह्यातील कापसाचा भाव हा ७५०० ते ८००० रुपये इतका आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव मिळत नसल्याने भाववाढ कापसाचा भाव १०००० झाला नाहीये. यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस घरात ठेवला आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील ८० ते ८५ टक्के कापूस अद्याप शेतकऱ्यांच्या घरात आहे.

मात्र यामुळे कापसाच्या वजनात घट होऊ लागली आहे. याचबरोबर कापसाचा दर्जाही खालवला आहे. यामळे शेतकरी चिंतीत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात कापसाची टंचाई निर्माण झाल्याने दीडशेपैकी केवळ ७५ जिनिंग प्रेसिंग मिल्स सुरू होत्या. आता त्यातील पन्नास जिनिंग बंद झाल्या आहेत. तर २५ जिनिंग बंद होण्याच्या मार्गावर आहेत.