जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । भारतात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत २५२७ नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्यामुळे देशात सक्रिय रुग्णांची संख्या १५,०७९ झाली आहे. सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे २ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.
गेल्या २४ तासात कोरोनामुळे ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, देशात २५२७ नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर १६५६ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४,३०,५४,९५२ वर गेली आहे. त्यापैकी ४,२५,१७,७२४ जण बरे झाले आहेत. अशा प्रकारे फक्त ०.०३ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. 98.75 टक्के लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.
दिल्लीमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढताना दिसतेय. याच पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, दिल्लीमध्ये देशात सर्वाधिक ३२५३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ केरळ (२६१३), कर्नाटक (१६३७), हरियाणा (१६३२) आणि यूपी (१०४४) यांचा क्रमांक लागतो. दिल्लीतच कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.