जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२१ । आज रविवारी दिवसभरात जिल्ह्यात १५९ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल ५२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याची चिन्हे आहेत. एप्रिल व मे महिन्यातील लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. रविवारी ८ हजार ३३९ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी १५९ नवे बाधित आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ४० हजार ८९२ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख ३५ हजार २८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३ हजार ४९ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात ४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृताचा आकडा २५५४ वर गेला आहे.
आजची कोरोना आकडेवारी
जळगाव शहर -९, जळगाव ग्रामीण- १, भुसावळ-११, अमळनेर-४, चोपडा-१, पाचोरा-१२, भडगाव-७, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-२, पारोळा-१, चाळीसगाव-९७, मुक्ताईनगर-२ आणि बोदवड-० असे एकुण १५९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.