⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | कोरोना | कोरोना अपडेट्स : जळगाव जिल्ह्यात आज नवीन ८०८ रुग्ण

कोरोना अपडेट्स : जळगाव जिल्ह्यात आज नवीन ८०८ रुग्ण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२०१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी दिवसेंदिवस कमी होत आहे. जळगावकरांनी लॉकडाऊन आणि प्रशासकीय निर्देशांचे काटेकोर पालन केल्याने कोरोना आकडेवारी कमी होत आहे.

जळगाव जिल्ह्यात मे महिन्याची सुरवात कोरोना संसर्गाच्या बाबतीत सुखावह झाली आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सलग चौथ्या दिवशी नवे रुग्ण हजाराच्या आत नोंदले गेले. मंगळवारी अवघे ८०८ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १०७६ इतका आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट पुन्हा एकदा ९० टक्क्यांवर गेला आहे.

आज जळगाव शहर-१५३, जळगाव ग्रामीण- ३१, भुसावळ-१३३, अमळनेर-२७, चोपडा-२९, पाचोरा- १६, भडगाव-१७, धरणगाव-०९, यावल-२५, एरंडोल-१९, जामनेर-३८, रावेर-७८, पारोळा-३२, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-७८, बोदवड-४६ आणि इतर जिल्ह्यातील ०८ असे एकुण ८०८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात मृत्यूसत्र कायम आहे. आज मंगळवारी पुन्हा १९ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे एकूण बळींचा आकडा २२५४ वर पोचला आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती सकारात्मकपणे बदल आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने कमी होत असून बरे होणाऱ्यांचा आकडा वाढतोय. गेल्या महिनाभरात प्रथमच रुग्णसंख्या आठशेच्या टप्प्यात आली आहे. जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी नोंदलेल्या ८०८ रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या १ लाख २५ हजार ४५४ झाली आहे. तर १०७६ रुग्ण दिवसभरात बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख १३ हजार ४३२ झाला आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट या लाटेत प्रथमच ९०.४२ टक्क्यांवर पोचला आहे.

author avatar
Tushar Bhambare