जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने कमी होतांना दिसून येत आहे. जळगावकर सरकारी नियमांचे काटेकोर पालन करत असल्यानेच कोरोना रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात २९१ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल ८०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या तीन चार दिवसांत दुपटीने रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. शिवाय, मृतांचा आकडा देखील खाली असला तरी दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला.
जळगाव जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ९१६ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख २९ हजार ७२६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर सद्यस्थितीला ६ हजार ६८७ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अर्थात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने ॲक्टिव रूग्णांची संख्या देखील आणखी कमी होईल. तर गेल्या २४ तासात ८ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २५०३ वर गेला आहे.