कोरोना

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा दुसरी लाट कमी होतानाचे दिसून येत आहे. लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे. दरम्यान, आज गुरुवारी नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज गुरुवारी दिवसभरात ७८९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ८१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात १२ जणांचा बळी गेला आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोनाने थैमान घातले होते. जिल्ह्यात रोज १००० ते १२०० रुग्ण आढळून येत होते. मृताचा आकडाही वाढीस गेला होता. कोरोनाची वाढती साखळी रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक संचारबंदी लावण्यात आली. त्याचे सकारात्मक परिणाम आता रुग्णांवर दिसून येत आहे. मागील महिनाभरापासून आणि विशेषत: मे महिना सुरु झाल्यापासून  जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे.

गुरुवारी दिवसभरात ७ हजार ५४२ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७८९ नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ३३ हजार ३१२ वर गेली आहे.. तर ८१६ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २० हजार ९७१ वर पोचला. जिल्ह्यात सध्या ९ हजार ८५५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर मागील काही दिवसापासून मृताचा आकडाही घटना दिसून येत. जिल्ह्यातील रिकव्हरी दर ९०.८१ वर  गेल्याने जिल्ह्यासाठी समाधानकारक आहे.

जळगाव शहर १२२, जळगाव ग्रामीण ३३, भुसावळ १०६, अमळनेर १६, चोपडा ३७, पाचोरा २९, भडगाव १५, धरणगाव ०७, यावल ४१, एरंडोल ११, जामनेर ३०, रावेर ५०, पारोळा २७, चाळीसगाव ८७, मुक्ताईनगर १६१, बोदवड २३, अन्य जिल्ह्यातील ०४.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button