जळगाव कोरोना अपडेट ; जिल्ह्याचा रिकव्हरी दर : ९६.८३%
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यात आज रविवारी सलग चौथ्या दिवशी नवे रुग्ण शंभराच्या आत आढळून आले. आज दिवसभरात ७६ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर १६८ रुग्ण बरे झाले. एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात येत आहे. मागील चार दिवसापासून जिल्ह्यात तीन महिन्यांनंतर रोजचे नवे रुग्ण शंभराच्या आत आढळून आले. आज 4 हजार ०३८ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत. त्यात आज रविवारी ७६ रुग्ण समोर आलेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख ४१ हजार ५२२ झाली आहे. दिवसभरात १६८ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३७ हजार ०३९ वर पोचला आहे. एका मृत्यूसह बळींचा आकडा २५६२ झाला आहे. जिल्ह्यात सध्या १९२१ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-१९, जळगाव ग्रामीण-०२, भुसावळ-०१, अमळनेर-००, चोपडा-०४, पाचोरा-०४, भडगाव-००, धरणगाव-०२, यावल-०५, एरंडोल-०१, जामनेर-०७, रावेर-०५, पारोळा-०४, चाळीसगाव-२०, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातील ०१ असे एकुण ७६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.