कोरोना
जळगाव जिल्ह्यात आज ४ नवीन बाधित आढळले
जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे ४ नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर ६ बरे होऊन घरी गेले आहे. आज १३ तालुके निरंक आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६३८ बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर २६ संक्रमित रुग्ण जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आजपर्यंत २५७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज जळगाव शहरात २ आणि अमळनेर तालुक्यात २ असे एकूण ४ संक्रमित रुग्ण आढळून आले आहे.