⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | कोरोना | CORONA UPDATES : जळगाव जिल्ह्यात आज १ हजार १४३ नवीन कोरोना रुग्ण

CORONA UPDATES : जळगाव जिल्ह्यात आज १ हजार १४३ नवीन कोरोना रुग्ण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना आकडेवाडी रोजच १ हजारपेक्षा जास्तने वाढत आहे. आज देखील जळगाव शहरातून १ हजार १४३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आज १ हजार ४४ लोकांनी कोरोनावर विजय मिळवला असून १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत कोरोनाचा फैलाव वाढत आहे. दररोज अकराशेहून अधिक रुग्ण समोर येत असल्याने सक्रिय रुग्णसंख्या १२ हजारांच्या जवळपास पोचली आहे. सोमवारी नव्या ११४३ रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या १ लाख ४ हजार १५२ झाली असून दिवसभरात १०४४ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा ९० हजार ५०४ वर पोचला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात मृताचा आकडा मात्र वाढताच आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १८ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बळींची संख्या १८२७ झाली आहे.

जळगावा शहरात रुग्णवाढ कायम

दररोजच्या रुग्णवाढीत जळगाव शहराचा अव्वल क्रमांक आहे. आज मंगळवारी शहरात २९६ नवे रुग्ण आढळून आले. तर आतापर्यंतची रुग्णसंख्या २७ हजार १६१ वर पोचली आहे. शहरातील २४० रुग्ण बरेही झालेत.

आज जळगाव शहर २९६ , जळगाव ग्रामीण ४४, भुसावळ ९९, अमळनेर ३१, चोपडा ९०, पाचोरा ४३, भडगाव ०४, धरणगाव ५५, यावल ३३, एरंडोल १२, जामनेर ५८, रावेर ८३, पारोळा ३८, चाळीसगाव ००, मुक्ताईनगर १९७, बोदवड ५३, अन्य जिल्ह्यातील ०७ असे एकूण १,१४३ नवीन कोरोना रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत.

author avatar
Tushar Bhambare