⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | कोरोनाने केला सावद्याच्या परदेशी कुटूंबाचा घात ; ४० दिवसात ६ वा मृत्यू

कोरोनाने केला सावद्याच्या परदेशी कुटूंबाचा घात ; ४० दिवसात ६ वा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । कोविडच्या आपत्तीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त  होतांना दिसून येत आहे . यात सावद्यातील छत्रपती शिवाजी चौकातील रहिवाशी शिवसेना पदाधिकारी कै सतिशसिंह गणपतसिंह परदेशी  यांचे कुटुंबातील पाच जणांचे कोरोनाने तर एका महिलेने  आजाराने निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली . याचपरदेशी  कुटुंबातील महिलेचा आज जळगाव शहरातील सारा हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजनअभावी मृत्यू झाल्यामुळे या कुटुंबातील मुलांनी अक्षरश :आक्रोश केला . अवघ्या ४० दिवसांमध्ये या परिवाराचे होत्याचे नव्हते झाल्याने  शहरासह परिसर सुन्न झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावदा येथील प्रतिभा कैलाससिंह परदेशी ( वय ४८ ) या महिलेचा आज जळगावातील सारा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. ऑक्सीजन संपल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या मुलांनी केला आहे. याची दखल घेत जळगाव चे महापौर व उपमहापौरांनी हॉस्पीटलला भेट देऊन माहिती जाणून घेत त्यांना संबंधीतांवर कारवाईची ग्वाही दिली आहे. यात पुढे काय होईल ते होईल. मात्र यातून सावदा येथीलछत्रपती शिवाजी चौकातील  परदेशी कुटुंबावरील भयंकर आघाताने  शहरासह परिसर सुन्न झालेला आहे. या एकाच कुटुंबात ४० दिवसांमधील हा सहावा मृत्यू आहे  सावदा येथील परदेशी कुटुंब हे  राजकीय कर्तबगार आणि प्रतिष्ठीत असे मानले जाते. या कुटुंबातील पत्रकार म्हणून कार्यरत असणारे कैलाससिंह गणपसिंह परदेशी (वय ५० ) यांचे गेल्या

गेल्या महिन्यात २५ तारखेला कोरोनाचा उपचार सुरू असतांना मुक्ताईनगर येथे  निधन झाले होते. तर  त्यांचे बंधू तथा एलआयसी एजंट किशोर गणपतसिंह परदेशी (वय ५२) आणि त्यांची पत्नी संगीता किशोर सिंह परदेशी (वय ४८) यांचे देखील कोविडच्या संसर्गावरील उपचार सुरू असतांना अनुक्रमे २१ मार्च आणि २५ मार्च रोजी जळगाव येथे  निधन झाले . तर कैलाससिंह आणि किशोर परदेशी यांच्या मातोश्री कुवरबाई गणपतसिंह परदेशी वय ८५ यांचा अन्य व्याधीवर उपचार सुरू असतांना निधन झाले.

अवघ्या चार दिवसात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसर अक्षरश : स्तब्ध झाला होता. यानंतर याच कुटुंबातील राजेंद्र गणपसिंह परदेशी यांचा कोरोनाने ३१ मार्च रोजी जळगाव येथे  मृत्यू झाला. यानंतर या कुटुंबातील प्रतिभा कैलाससिंह परदेशी यांच्यावर  जळगाव येथील सारा मल्टी – स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. त्या उपचारांना प्रतिसाद देखील देत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या जेवण देखील घेत होता. मात्र त्यांना त्यांच्या कुटुंबातील मुलांनी इतरांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील दिली नव्हती. येत्या काही दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी मुलांना अपेक्षा होती.

तथापि, आज आकस्मीकपणे प्रतिभा परदेशी यांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबासह परिसराला  पुन्हा एकदा हादरा बसला आहे. म्हणून त्यांनी कैलाससिंह परदेशी यांचा जनसंपर्क दांडगा असून दैनिक सामनाचे प्रतिनिधी आपल्या कार्यकुशलतेची छाप सोडली होती. तर त्यांचे बंधू किशोर हे देखील एलआयसीमध्ये असल्याने त्यांचा मोठा मित्र परिवार होता. हे कुटुंब परिसरात प्रतिष्ठीत म्हणून गणले जाते. यामुळे एकाच कुटुंबातील सहा कर्त्या स्त्री – पुरूषांचा मृत्यू झाल्याने  परिसरात दुःखाचे वातावरण आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.