⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

जळगावकरांनो सावधान… जिल्ह्यात सर्वत्र बेड फुल… स्मशानभूमीतदेखील वेटिंग…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना आकडेवाडी दिवसेंदिवस महाभयंकर रूप घेत आहे. रोजचे १ हजारपेक्षा जास्त करून रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हाभरात बेड फुल असल्याची परिस्थिती समोर येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासन आपल्यापरीने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहेत. मग आता यात चूक कोणाची? याचा आपण सर्व जळगावकरांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

मागील १०-१५ दिवसांपासून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचा अंदाज प्रशासनाला येत होता. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ओटू बेड तातडीने वाढवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी संपूर्ण रुग्णालयात ओटू बेड तयार करण्यात आले. परंतु दोनच दिवसात हे नवीन ओटू बेड देखील फुल झाले. वाढवून वाढवून प्रशासन किती बेड वाढवेल? जोवर आपण आपला निष्काळजीपणा कमी करत नाही तोवर प्रशासन करून करून काय करेल याचा विचार आपण करायला हवा.

जीएमसीतील ३५९, तर इकरा सेंटरमधील ५० ओटू बेड फुल्ल असल्याने, रुग्णांना बेडसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमध्येही सर्व ४०० बेड फुल्ल झाले आहेत. मेल्यानंतरही रुग्णाची ‘वेटिंग’ संपत नाहीये. स्मशानभूमीतदेखील तशीच परिस्थिती आहेत. ओटे कमी आणि प्रेत जास्त असं झालाय.

आता फक्त प्रशासनाला दोष देऊन काही होणार नाहीये. हि परिस्थिती आपण सर्व जळगावकरांनी जाणीवपूर्वक ओढवून घेतलीये. आता तरी सुधरा. आपण करत असलेल्या गर्दीमुळेच कोणीतरी रोज त्याचा बाप, आई, बहीण, मुलगा गमावतंय. जळगावकरांनो थोडी तरी लाज वाटू द्या. प्रशासनला सहकार्य करा.