काढणीपूर्वीच मक्याचे भाव कोसळले ; शेतकरी चिंतेत

फेब्रुवारी 19, 2026 4:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मका पिक काढणीच्या टप्प्यावर असतानाच बाजारभावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मका पिक पूर्णपणे परिपक्व झाले असून अनेक शेतकरी काढणीला सुरुवात करत आहेत. मात्र काढणीपूर्वीच दर कोसळल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणीचे सावट निर्माण झाले आहे.

maka corn

काही दिवसांपूर्वी मक्याला प्रतिक्विंटल सुमारे २,१०० रुपये दर मिळत होता. सध्या तोच दर घसरून सुमारे १३०० ते १,४०० रुपयांवर आला आहे. दरातील या मोठ्या घसरणीमुळे उत्पादन खर्च निघेल का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

Advertisements

मक्याचे दर हे दर्जानुसार निश्चित केले जातात. त्यामुळे शासनाने या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन दर स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Advertisements

यावल तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर मका लागवड करण्यात आली आहे. दरात आणखी घसरण झाल्यास या भागातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now