⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | आनंदाची बातमी! जळगाव RTO कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर

आनंदाची बातमी! जळगाव RTO कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२३ । परिवहन विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील ९ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा वाढवून प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) रुपांतर करण्यात आले. यात जळगावचा देखील समावेश आहे.

जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाऐवजी आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालय २०२२ मध्ये मंजूर झाले होते. अखेर आज शासनाने अध्यादेश काढत प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर केले आहे.

जळगावला सध्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. ते धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारीत आहे. मात्र आता स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय होणार आहे. महसुली विभागाप्रमाणेच राज्यातील सहा विभागीय कार्यालयातील उपायुक्तांनादेखील सहआयुक्तांचा दर्जा देण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा मोठा व क्षेत्रफळही मोठे असल्याने चाळीसगावला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव होता. मात्र, तो भडगावचा करण्यात होता.

राज्यातील या ९ जिल्ह्यांच्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे दर्जामध्ये वाढ?
राज्यातील पिंपरी -चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, वसई (जि. पालघर, अकोला, बोरीवली (मुंबई) व सातारा येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे दर्जामध्ये वाढ करुन प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर करण्याचा निर्णयाला शुक्रवारी शासनाने मान्यता दिली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.