जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत ग्रामपंचायतींना जन सुविधांसाठी अनुदान योजनेतून जिल्ह्यातील 148 गावांना जन सुविधांसाठी अनु दादाच्या योजनेतून स्मशानभूमी बांधकाम आणि सुशोभीकरणासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये मिळणार आहेत. याप्रमाणे 14 कोटी 80 लाख रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी याचे नियोजन केले होते
प्रत्येक गावाला दहा लाखांचा निधी मिळणार असून त्यातले पाच लाख हे बांधकामासाठी तर पाच लाख सुशोभीकरण यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
तालुकानिहाय मंजुरी समशान भूमी
अमळनेर 13 ,भडगाव 9, भुसावळ 2, चाळीसगाव १०, चोपडा ७, धरणगाव ७, जळगाव २२, जामनेर 10, मुक्ताईनगर 11, पाचोरा 20, पारोळा 14, रावेर 8, यावल ४