⁠ 
रविवार, मे 5, 2024

भुसावळ बाजारपेठचा हवालदार तडकाफडकी निलंबित ; नेमकं प्रकरण काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२३ । कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार सुनील जोशी यांना जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी तडकाफडकी निलंबित केल्याने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली.

नेमकं प्रकरण काय?
शहरातील भागवत सावकारेंना संशयित दिलीप ठाकूर याने मारहाण केल्याचा आरोप होता. हे प्रकरण बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर संशयित दिलीप ठाकूर विरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करू असे सांगत, जोशी यांनी भिती घातली. ठाकूर याच्याकडे ४ लाख रुपये लाच मागितल्याचा आरोप आहे. शिवाय लाचेच्या रकमेत वरिष्ठांना ही हिस्सा द्यावा लागतो, असे सांगून अधिकाऱ्यांची नावे सुध्दा घेतली होती.

काही दिवसांनी जोशी यांनी पैसे मागितल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. पोलिस दलापर्यंत ही क्लिप पोहोचल्याने डीवायएसपी यांनी जोशी यांचा कसूर अहवाल पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. या अहवालाची चौकशी होऊन निलंबन केल्याची माहिती अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली

या कारवाईने जळगाव जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली