जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । २०१९ च्या निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार(mva government) स्थापन केली होती. अडीच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाले. मात्र यानंतर आता तिन्ही पक्षांमध्ये फूट पडण्याची चिन्ह आहे.
औरंगाबादमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी हजेरी लावली. यावेळी बोलत असताना नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली तसंच महाविकास आघाडीच्या भविष्यावरही भाष्य केलं. ‘महाविकास आघाडी नैसर्गिक युती नाही, ना कोणतीही पर्मनंट आघाडी नाही. विपरीत परिस्थिती एकत्र आलेले पक्ष आहे, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची चिन्ह आहे.
‘पहाटेचे सरकार पडले तेव्हा उद्धव ठाकरे, शरद पवार हे सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते म्हणून आम्ही सरकारमध्ये आलो. आमची आघाडी विपरीत परिस्थिती मध्ये झाली होती. आमची नैसर्गिक आघाडी नाही हे सत्य आहे. आमची काही नैसर्गिक युती नाही, चर्चा करून निर्णय घ्यायला हवा आम्ही अजूनही चर्चेला तयार आहोत. पण हे साधं बोलायला विचारायला तयार नाही, अशी टीकाही पटोलेंनी सेनेवर केली.
विधान सभेत राष्ट्रवादी विरोधीनपक्ष नेते झाले, विधान परिषद नेतेपद आम्हाला हवे होते बसून निर्णय घेता आला असता, मात्र आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि नेता निवडला, असं म्हणत पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.