⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

सर्वात मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२३ । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केले आहे. खरं तर, सुरत कोर्टाने काल गुरुवारी राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलं आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून खासदार होते.

राहुल गांधी 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूकीच्या प्रचार सभेत “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सामान्य का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का? असं विधान केलं होते.

राहुल यांच्या या विधानाबाबत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर कलम ४९९, ५०० अंतर्गत फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. आपल्या तक्रारीत भाजप आमदाराने आरोप केला होता की 2019 मध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना, सर्व चोरांना मोदी हे आडनाव का आहे, असे म्हणत राहुल यांनी संपूर्ण मोदी समुदायाची बदनामी केली.

सुरत न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली

खरं तर, ‘मोदी आडनाव’ असलेल्या विधानासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. राहुल गांधी यांनी कर्नाटकातील 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हे वक्तव्य केले आहे. न्यायालयाने राहुलला १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करताना ३० दिवसांची शिक्षा स्थगित केली. दरम्यान, राहुल गांधी या शिक्षेला वरच्या न्यायालयात आव्हान देऊ शकतात. न्यायालयाने आपल्या 170 पानांच्या निर्णयात म्हटले आहे की, आरोपी हे स्वतः खासदार (संसद सदस्य) आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानंतरही आचरणात कोणताही बदल झाला नाही.