जी.डी.सी अँड ए व गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षेचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या जी.डी.सी.अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा दि.२३, २४ व २५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागामार्फत जी.डी.सी.अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा दि. २३, २४ व २५ ऑक्टोबर रोजी जळगाव शहरातील सौ. सु.ग.देवकर प्रायमरी स्कुल या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परिक्षेसाठी बसलेल्या परिक्षार्थींनी बैठक व्यवस्था अथवा इतर काही तांत्रिक अडचणी असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, २ रा माळा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टप्पा क्र.३, आकाशवाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालया शेजारी, जळगाव येथे किंवा ०२५७-२२३९७२९, धिरज पाटील ९४०५१४३७७७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी केले आहे.