⁠ 
गुरूवार, डिसेंबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | हिंगोने खुर्द येथील रेशनचा काळ्याबाजाराबाबत प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार

हिंगोने खुर्द येथील रेशनचा काळ्याबाजाराबाबत प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धरणगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथील रेशन दुकान नंबर ८२ मध्ये अनेक गैरप्रकार व गैरव्यवहार होत असल्याची तक्रार आदिवासी नागरिकांनी उपविभागीय अधिकारी एरंडोल विनय गोसावी यांच्याकडे केली आहे. भिल्ल समाज विकास मंच या संघटनेच्या माध्यमातून सदर तक्रार करण्यात आली आहे.

स्वस्त धान्य कमी वाटप करणे, ऑनलाईन पावती कार्डधारकांना न देणे. पावती मागितली असल्यास अरेरावीची भाषा करणे कार्डधारकांना धमक्या देणे. अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

अनुसूचित जाती जमातीच्या गरीब व अशिक्षित लोकांचा गैरफायदा घेऊन धान्य कमी देण्याचा प्रकार होत आहे.

तहसीलदार धरणगाव व पुरवठा अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करूनही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आले आहेत. तरी या प्रकरणी सखोल चौकशी होऊन सदर स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करावा अशी मागणी भिल्ल समाज विकास मंच संघटनेतर्फे करण्यात आले आहे अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर जिल्हा अध्यक्ष दीपक अहिरे, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती मालचे, विजय ठाकरे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.