जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्याकडुन शहरात व जिल्ह्यात समाज हिताचे व लोककल्याणाचे विविध उपक्रम राबविले जातात. त्याच प्रमाणे पाटील धर्मार्थ दवाखान्याची देखील स्थापना जळगाव शहरातील वाघ नगर रिक्षा स्टॉप जवळ ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर करण्यात आली आहे. दि.७ रोजी याठिकाणी समिती गठीत करुन पहिली बैठक देखील संपन्न झाली. यावेळी पाटील धर्मार्थ दवाखान्याचे चेअरमन डॉ. अनिल शिरसाळे यांनी दवाखान्याची संपुर्ण माहिती व कामकाज कशाप्रकारे चालवले जाणार याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर रेड क्रॉस सोसायटी चे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी मार्गदर्शन केले.
निवड करण्यात आलेल्या समितीमध्ये सदस्य संजय पाटील, प्रा. दिलीप भारंबे, रविंद्रसिंग पाटील, डॉ. नरेंद्र ठाकूर, प्रशांत पाटील, सुमित देशमुख, दिपक सपकाळे, अजय पाटील यांचा समावेश आहे.
सदर समिती गठीत करण्याकरिता रेडक्रॉस सोसायटी चे उपाध्यक्ष गनी मेमन, रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढी चे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, रेडक्रॉस सोसायटी संचलित आपत्ती व्यवस्थापन समितीचे चेअरमन सुभाष साखला व रेडक्रॉस सोसायटी संचलित पाटील धर्मार्थ दवाखान्याचे चेअरमन डॉ. अनिल शिरसाळे उपस्थित होते.