जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२३ । ‘ग. स’. सभासद कर्जावरील व्याजदर कपात तसेच मयत सभासदांसाठी १००% कर्ज माफीच्या निर्णयापाठोपाठ ‘ग. स’. सभासदांना गृप नैसर्गिक मृत्यू जीवन सुरक्षा विमा लागू करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी कि, सन 2020 / 21 या आर्थिक वर्षात कोविड- 19 मुळे 496 सभासदांचा मृत्यु झाल्याने निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीचा विचार करून संस्थेने सभासद हिताला प्राधान्य देवुन समाजाभिमुख कल्याणकारी योजना राबविण्याच्या उदात्त हेतुने संस्थेने भारत सरकारच्या मान्यता प्राप्त (IRDA) विमा कंपनी भारती (AXA) लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. कडून सहकार खात्याच्या मंजुरीने “गृप नैसर्गिक मृत्यु जिवन सुरक्षा विमा पॉलिसी रक्कम रुपये 5.0 लक्ष मात्र सेवेत कार्यरत असलेल्या सभासदांची विमा पॉलिसी काढण्यात आलेली आहे.
ग.स. 114 व्या वर्षात पदार्पण करीत असतांना संस्थेने सभासद कर्जावरील व्याज दरात कपात तद्नंतर मयत सभासदांसाठी 100% कर्ज माफीच्या निर्णयाच्या पाठोपाठ दिनांक 5 मार्च 2023 पासून कोणत्याही कारणास्तव ग.स. सभासदांचा मृत्यू झाल्यास “गृप नैसर्गिक मृत्यू जिवन सुरक्षा विमा पॉलिसीद्वारे रक्कम रुपये 5.0 लक्ष रुपये व अपघाताने मृत्यु झाल्यास गृप जनता अपघात विमा अंतर्गत मयत सभासदांच्या कुटुंबियांना एकुण रक्कम रु. 10.0 लक्ष रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष उदय पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.