⁠ 
रविवार, मे 19, 2024

शेतकरी सुखावला ; जळगावसह राज्यात पावसाचे कमबॅक, आजचा दिवस कसा असेल?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२३ । गेल्या महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर राज्यात पावसाचे कमबॅक झाले आहे. हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून राज्यात काही भागात पावसाने कमबॅक केलं आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली. यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळणार आहे.

देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे यावर्षी जून आणि ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. पावसाच्या ब्रेकमुळे खरीप हंगाम धोक्यात आला. सप्टेंबर महिन्यात चांगला पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे. आता कृष्ण जन्माष्टमीला राज्यात पाऊस सुरु झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

या जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी
पश्चिम बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा हळू हळू वायव्येकडे सरकत आहे. यामुळे राज्यात कृष्ण जन्माष्टमीला मॉन्सून सक्रिय झाला आहे. आज राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात पाऊस झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये बुधवारी दुसरी पावसाने हजेरी लावली. यामुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला. सोबतच या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. आगामी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.

जळगांव जिल्हा 7/ 09/2023 ????????
भडगाव-11
भुसावळ-7.8
पाचोरा-10
पारोळा-
जामनेर-19
चोपडा-2
चाळीसगाव-3
रावेर-
मुक्ताईनगर-
धरणगाव-12
यावल-3
एरंडोल-19
जळगाव-