Jalgaon : जुन्या वादातून महाविद्यालयीन तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात

डिसेंबर 31, 2025 4:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२५ । जळगाव शहरात शुल्लक कारणावरून होणाऱ्या हल्ल्याच्या घटना वाढतं असल्याचं दिसत असून अशातच एका तरुणावर जुन्या वादातून चाकूने हल्ला करण्यात आला आहे. यात साई गणेश बोराडे (वय १८, रा. शंकरराव नगर, जळगाव) हा गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. ही घटना आज बुधवारी शहरातील गोलाणी मार्केटजवळ घडली असून हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले.

chaku halla

नेमकी घटना काय ?
देवकर महाविद्यालय येथे डिप्लोमाचे शिक्षण घेत असलेला साई बोराडे याचे संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे (वय २५, रा. चौगुले प्लॉट,जळगाव) याच्याशी त्याचे जुने वाद होते. या शिवाय बुधवारी सकाळी देखील शुभम आणि साई यांचे एकमेकांशी किरकोळ कारणावरून वाद झाले होते. दुपारी गोलाणी मार्केट जवळ साई बोराडे हा आला होता.

Advertisements

तेव्हा गोलाणी जवळ आलेल्या संशयित आरोपी शुभम याने साईला पाहिले आणि त्याने चाकू काढून साई बोराडेवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साईला नागरिकांनी तातडीने एका रिक्षामध्ये टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी प्रथमोपचार केल्यानंतर साई बोराडे याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

Advertisements

दरम्यान या घटनेतील हल्लेखोर शुभम सोनवणेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now