⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | कोरोनाच्या उपचारासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन गाईडलाईन्स ; जाणून घ्या काय आहे?

कोरोनाच्या उपचारासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन गाईडलाईन्स ; जाणून घ्या काय आहे?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने जवळपास सर्व शासकीय आणि खासगी रूग्णालयांमध्ये बेड फुल्ल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या उपचारासाठी बेडची कमतरता पडत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपचारासाठी नवीन परिपत्रकाच्या माध्यमातून नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

यात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. त्यामुळे काही गरजू रुग्णांना बेड (खाट) उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन ऑक्सीजन बेडची जास्तीत जास्त सुविधा सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यरत आहे. सद्यस्थितीत गरजू रुग्णांना औषधोपचार मिळणे ही प्राधान्याची बाब असून त्यांना पुढे गंभीर स्थितीत रुग्णालयात भरती करण्याची वेळ येऊ नये यासाठी खालील उपाययोजना / आवाहन करण्यात येत आहेत.

-लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णास ऑक्सीजन व अत्यावश्यक उपचाराची आवश्यकता नसल्याने त्यांना ओपीडी म्हणजे बाहयरुग्ण विभागातून योग्य समुपदेशन करुन उपचार करावा व वेळोवेळी तपासणी (गरज भासल्यास) करावी.

-८ ते १५-२५ इतकी तीव्रता असणारा व मध्यम स्वरुपाचे छातीचे सी.टी.स्कॅन मूल्यमापन असेल आणि इतर आजार (मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा व हृदयविकार) असलेल्या रुग्णांना जरी आज ऑक्सिजनची गरज भासत नसली, तरी अशा रुग्णांवर रेमडेसीवीर इंजेक्शन/हिपॅरॅनी/डिक्झामिथाझोन आदींसारख्या औषधांनी क्लिनीकल जजमेंट आणि प्रोटोकॉल नुसार वेळीच उपचार करण्यात यावेत.

– वरील प्रमाणे औषधोपचार केल्यास सदर रुग्ण पुढील काळात गंभीर अवस्थेत भरती करण्याची वेळ येणार नाही, असे तज्ञ डॉक्टरांचे मत असेल व केवळ बेड्सच्या उपलब्धता नसल्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास अडचण येत असेल तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये रुग्णांच्या संमतीने त्या रुग्णांवर डे-केअर उपचार करावेत.

-रुग्णांस वरील प्रमाणे इंजेक्शन/औषधोपचार करुन काही काळ निरीक्षणाखाली ठेवून आयसोलेशन केलेल्या ठिकाणाहून रूग्रवाहिकेद्वारे ने-आण करण्यात यावी.

-वर नमुद बारबींचा अवलंब केवळ बेडस उपलब्ध होत नसेल तरच करावा, जेणे करुन मध्यम सीटी स्कॅनची तीव्रता असलेल्या इतर आजारांच्या कोमॉर्बीडरुग्णांना वेळीच योग्य औषधोपचार मिळून त्यांना पुढील काळात गंभीर होण्याचा धोका काही प्रमाणात टाळता येईल. तसेच अशा रुग्णांना पुढील काळात बेड्स उपलब्ध झाल्यास भरती करणे आवश्यक असल्यास भरती करण्यात यावे किंवा इतर रुग्णालयात जिथे बेड्स उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी संदर्भित करण्यात यावेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.