⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

जळगावात थंडीचा कडाका कायम ; आगामी 5 दिवस असे राहणार तापमान?

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२४ । उत्तर भारतातून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवत आहे. राज्यातील अनेक शहरांचा पारा दहा अंशाच्या खाली आला आहे. अचानकच आलेल्या थंडीमुळे राज्यातील नागरिकांना हुडहुडी भरली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना शेकोट्ट्यांचा आधार घ्यावा लागत आहे

मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. तापमानात देखील चढ उतार होत आहे. सध्या उत्तर महाराष्ट्र हुडहुडी भरवणारी थंडी पडत आहे. नाशिकमधील निफाड तालुक्याचा पारा घसरला असून कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये निफाडमध्ये ४.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ४.६अंश सेल्सिअसवर गेला आहे.

जळगावात तापमानात वाढ होणार
दुसरीकडे जळगावातही तापमान कमी होते. बुधवारी किमान तापमान ९ अंश तर कमाल २९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आगामी चार पाच दिवसात मात्र तापमानात वाढ दिसून येईल.आज जानेवारी तापमानाचा पारा ९ अंशावर राहील. तर २६ जानेवारी वाढ होऊन १० अंशावर जाऊ शकते. २७ जानेवारीला पुन्हा घसरण होऊन ९ अंशावर येईल. २८ जानेवारीला पुन्हा वाढ होऊन १० अंश तर २९ जानेवारीला ११ सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे.

सध्याच्या बोचऱ्या आणि कडाक्याच्या थंडीमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. थंड वाऱ्यांमुळे नागरिकांना दिवसभर बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. अचानकच आलेल्या थंडीमुळे राज्यातील नागरिकांना हुडहुडी भरली आहे.