⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

बांबरुड राणीचे विकास सोसायटीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । बांबरुड राणीचे तालुका पाचोरा येथिल विविध कार्यकारी कृषी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार दिलीप  वाघ यांच्या खंबीर नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रणित सहकार पॅनलने भाजप प्रणित पॅनलचा धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला असून पॅनलचे सर्व च्या सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झालेले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार  दिलीप ओंकार वाघ यांच्या खंबीर नेतृत्वात संस्थेने नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली असून शेतकरी हित लक्षात घेऊन सर्वसमावेशक व लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या सुज्ञ व शेतकरी उमेदवारांना संधी मिळावी म्हणून सहकार पॅनलवर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दर्शवत सहकार पॅनल संधी दिली आहे.

सर्वसाधारण मतदार संघ गटातून  दारकोंडे अशोक रामदास, गोराडे रवींद्र माणिक, जगताप राजेंद्र जयराम, कोकणे महादू बना, मेवाती उस्मानखा, शिंदे माणिक विठ्ठल, सूर्यवंशी निवृत्त शामराव, वाघ ईश्वर सिताराम, महिला राखीव मतदारसंघातून पाटील छायाबाई रवींद्, पाटील सुरेखा प्रका, इतर मागासवर्गीय गटातून वाघ मधुकर ओंकार, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून वडर महारु रामा विजयी झाले