⁠ 
रविवार, मे 19, 2024

नाशिकच्या चलन नोट मुद्रणालयात नोकरीची मोठी संधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२३ । सरकारी नोकरी मिळविण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. नाशिकच्या चलन नोट मुद्रणालयात काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पदानुसार इच्छुक उमेदवाराला cnpnashik.spmcil.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारिक 18 नोव्हेंबर 2023 आहे. CNP Nashik Recruitment 2023

या भरतीद्वारे एकूण 117 जागा भरल्या जातील. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. CNP Nashik Bharti 2023

पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता :
1) सुपरवाइजर (टेक्निकल ऑपरेशन्स-प्रिंटिंग) 02
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी प्रिंटिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc.Engg (प्रिंटिंग).
2) सुपरवाइजर (अधिकृत भाषा) 01
शैक्षणिक पात्रता : (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजीत अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव.
3) आर्टिस्ट (ग्राफिक डिझाइन) 01
शैक्षणिक पात्रता : फाइन आर्ट्स/व्हिज्युअल आर्ट्स/व्होकेशनल (ग्राफिक्स) ग्राफिक डिझाइन/कमर्शियल आर्ट्समध्ये 55% गुणांसह पदवी
4) सेक्रेटरियल असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी/हिंदी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी/हिंदी टायपिंग 40 श.प्र.मि.

5) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-इलेक्ट्रिकल) 06
शैक्षणिक पात्रता : ITI NCVT/SCVT (इलेक्ट्रिकल)
6) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-मशीनिस्ट) 02
शैक्षणिक पात्रता : ITI NCVT/SCVT (मशीनिस्ट)
7) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-फिटर) 04
शैक्षणिक पात्रता : ITI NCVT/SCVT (फिटर)
8) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-इलेक्ट्रॉनिक्स) 04

शैक्षणिक पात्रता : ITI NCVT/SCVT (इलेक्ट्रॉनिक्स)
9) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-AC) 04
शैक्षणिक पात्रता : ITI NCVT/SCVT (AC)
10) ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग/कंट्रोल) 92
शैक्षणिक पात्रता : ITI NCVT/SCVT (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेट मेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग)/ ITI (प्लेट मेकर कम इम्पोझिटर / हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
अर्ज शुल्क: जनरल/ओबीसी/ EWS:₹600/- [SC/ST/PWD:₹200/-]
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा