⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जयंत पाटीलांचं एकनाथ खडसेंच्या ‘राजकीय घुमजाव’वर भाष्य, काय म्हणाले वाचा..

जयंत पाटीलांचं एकनाथ खडसेंच्या ‘राजकीय घुमजाव’वर भाष्य, काय म्हणाले वाचा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२४ । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळींच्या दौऱ्याला वेग आला आहे. यातच शिव स्वराज्य यात्रानिमित्त शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहे. यादरम्यान एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार होते मात्र भाजपकडून ग्रीन सिग्नल न आल्याने खडसे यांनी राष्ट्रवादीतच राहणं पसंत केलं आहे. त्यावर राष्ट्रवादी जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?
खडसे यांनी त्यांच्यावरची परिस्थिती मला सांगितली होती. पवार साहेबांना सांगितली होती. त्यावेळच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी काही सूट मागितली होती. त्यावेळी त्यांना सूट देण्याचे ठरवलेलं होतं, असं जयंत पाटील म्हणालेत.

एकनाथ खडसे यांच्यावर आलेले परिस्थिती ही खूप अडचणीची होती. ती परिस्थिती आता निवळलेली आहे. त्यामुळे त्यांना त्यावेळी पक्ष सोडण्याची आवश्यकता वाटली नाही. पण त्यांनी ही परिस्थिती कानावर टाकली होती. खडसे नेत्यांच्या वरचे परिस्थिती मला आणि पवार साहेबांना सांगितले होते. त्यांच्यावर आलेली परिस्थिती प्रचंड अडचणीची होती, असं जयंत पाटील म्हणाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.