महाराष्ट्रराजकारण

मनसेसोबतच्या युतीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठ विधान ; काय म्हणाले वाचा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । गेल्या अनेक दिवसापासून शिंदे गट, भाजप आणि मनसे यांच्यांतील जवळीक वाढत आहे. शिवतीर्थावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही एकाच मंचावर उपस्थित होते. यामुळे शिंदे गट, भाजप आणि मनसे युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र आता या चर्चेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओठ खुलासा केला आहे.

दिवाळीमध्ये आम्ही मनसेच्या कार्यक्रमाला गेलो होतो. राज ठाकरे यांनी मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं होतं. दिवाळीचा सण आनंदाचा साजरा होताना आपण राज्यामध्ये पाहत आहोत. यावेळी आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
शिंदे गटामध्ये आमदार नाराज नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. योग्य वेळी सगळ्या गोष्टी होत असतात, असंही शिंदे म्हणाले.

‘नाना पटोले यांनी सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. हे भाष्य मुळात हास्यास्पद आहे. आमच्याकडे मोठ बहुमत आहे. भक्कम पाठिंबा असलेले सरकार स्थापन झाले आहे. ती महिन्यामध्ये 72 मोठे निर्णय घेतले आहे. राज्याच्या हिताचे निर्णय घेतले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे, तर बाळासाहेबांची शिवसेना हा दुसरा पक्ष ठरला आहे. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. त्यांना बोलू द्या. विरोधी पक्ष टीका करत आहे. आम्ही त्यांच्या टीकेला कामाने प्रत्युत्तर देऊ’ असा पलटवारही शिंदेंनी केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button