महाराष्ट्रराजकारण
… अन् मुख्यमंत्र्यांना गिरीशभाऊंनी सावरले
जळगाव लाईव्ह न्यूज| २७ फेब्रुवारी २०२३ | भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून प्रचलित असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी आज चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावरले.
तर झाले असे की, मुंबई येथे अधिवेशन सुरू आहे. यावेळी अधिवेशना बाहेर पडताना विधिमंडळाच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसोबत चालताना त्यांचा तोल गेला. यावेळी बाजूला असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांना सावरले.
गिरीश महाजन हे भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक म्हणून प्रचलित आहेत मात्र यावेळी त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना सावरल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.