जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२३ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नांवर न बोलता फक्त उदघाटन केली आणि निघून गेले. याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गाजर दाखविण्याचेच काम त्यांनी केले आहेत. असा आरोप आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष विष्णु भंगाळे यांनी केले.
पद्मालय विश्राम गृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्याच्या सोबत महानगर प्रमुख शरद तायडे, महिला महानगर प्रमुख प्रतिभा सोनावणे व सह संपर्क प्रमुख गुलाब वाघ कार्यकर्ते उपस्थित होते. ते म्हणाले की, आम्ही पक्ष म्हणून नव्हे तर शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्याकरिता वेळ मागून भेटायला येण्याचे पत्रही दिले होते. पण आम्हाला भेटू न देता टांगाटोली करून अतिरेक्यां प्रमाणे उचलण्यात आले, महिलांशी हुज्जत घालण्यात आली. तर दु २ ते रात्री १० पर्यंत पोलीस स्थानकात बसवून ठेवण्यात आले.
तर मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी त्यांनी बोलायला हवं होत. मात्र आम्हाला त्यांना भेटूही दिले नाही. तसे आदेश वारू पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले असल्याचे आम्हाला पोलिसांनी सांगितल्याची माहिती सह संपर्क प्रमुख गुलाब वाघ यांनी दिली असून शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्याला
नौटंकी म्हणत असाल तर तुम्ही २० वर्षे काय केले? असा प्रश्न उपस्थित करत ही लोकशाही आहे की हुकूमशाही हे ही विचारले आहे. तर शेतकऱ्यांच्या कापसाला दहा ते बारा हजार भाव मिळावा, सूर्यफुलाला आठ हजाराचा भाव मिळावा, शेतकऱ्यांना ५० हजार उत्पन्न मिळावे, आठ तास शेतीला उच्चदाबाने दिवसा वीज द्या, जळगावातून परत जात असलेले उद्योग धंदे परत आणा अशा मागण्या करत झालेल्या प्रकारचा जळगाव शिवसेना (उबाठा) कडून गाजर दाखवत निषेध व्यक्त करत असल्याचेही त्यांनी सांगितले.