---Advertisement---
जळगाव जिल्हा बोदवड

नागरिकांनो, लाभ घ्या : आमदार पाटलांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कर्करोग तपासणी व मोतीबिंदू उपचार शिबीराचे आयोजन

chandrakant patil
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोदवड येथे उद्या दि. 13, मंगळवार रोजी मोफत कर्करोग तपासणी व मोतीबिंदू उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

chandrakant patil

सकाळी १० ते ५ वाजेच्या दरम्यान शहरातील मुक्ताई भवन येथे नाशिक येथील सुप्रसिद्ध डॉक्टर उपलब्ध होणार आहे. महिलांची तपासणी करिता स्वतंत्र महिला डॉक्टर उपलब्ध होणार असून शिबिरात स्तनाचा कर्करोग,गर्भाशयाच्या कर्करोग, तोंडाचा कर्करोग, तोंडाच्या रोगाची लक्षणे,तोंडाच्या पोकळीमध्ये पांढरा तोंडाचा कर्करोग संपूर्ण तोंडाच्या रोगांची लक्षणे, तोडाच्या पोकळीमध्ये पांढरा/लालसर चट्टा तसेच व्रण/खडबडीत भाग, विशेषतः एक महिन्याहुन अधिक काळ बरे न झाले आतील गुलाबी त्वचा फिकट पडणे. नेहमी प्रमाणे तोंड उघडण्यास अवघड जाणे, मसालेदार अन्न खाण्यास त्रास होणे,जीभ बाहेर काढण्यास त्रास होणे. आवाजामध्ये बदल होणे (आवाज किनरा / घोगरा होणे) अति प्रमाणात लाळ सुटणे, चावणे/ गिळणे/ बोलण्यास त्रास होणे.

---Advertisement---

या आजाराची लक्षणे लघवी विसर्जनात किंवा लघवीच्या जागी बरी न होणारी जखम शरीरात कोणत्याही भागातून असामान्य रक्तस्त्राव स्तन किंवा शरीराच्या इतर भागात (जसे काख,जांघ मान इत्यादी ठिकाणी गाठ),शरीरात आलेल्या गाठीच्या आकारात वाढ होणे, अपचन किंवा गिळण्यास त्रास होणे. वांग/ तिळाच्या रंगात किंवा आकारात अनपेक्षित बदल बरा न होणारा खोकला व आवाज घोगरा होणे,गर्भाशयाच्या सर्वसामान्य लक्षणे रजोनिवृती पश्चात रक्तस्त्राव ,समागमानंतर रक्तस्त्राव दोन पाळींच्या दरम्यान रक्तस्त्राव योनीमार्गातून दुर्गध येणे श्वेतप्रदर / अतिप्रमाणात अंगावरून जाणे ओटीपोटाच्या खालील भागात वेदना पुरुषांच्या कर्करोगाची लक्षणे :असामान्य खोकला टेस्टिक्युलर गांठ ,जास्त थकवा जाणवणे आतड्यात बदल गुददवार रक्तस्त्राव होणे,अनपेक्षित वजन कमी होणे मूत्रात बदल होणे,सतत पाठदूखी सारखे लक्षणे असतात.

महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सदरील चाचणीत ज्या रुग्णाची चाचणी पॉझीटिव्ह आली, त्या रुग्णास पुढील उपचाराकरिता प्रवास, औषधोपचार तसेच आवश्यकता असल्यास शस्त्रक्रीया व राहण्याची व्यवस्था मोफत करण्यात येईल. नगराध्यक्ष आनंदा पाटील,आरोग्यदूत गोलू बरडीया,नगरसेवक शे सईद बागवान,सुनील बोरसे,दिनेश माळी नितीन चव्हाण,हर्षल बडगुजर, संजय गायकवाड,निलेश माळी यांच्यासह बोदवड तालुक्यातील पदाधिकारी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेत असून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---