जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२६ । जळगाव शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग ७ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला गणेश कॉलनीसह संपूर्ण परिसरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ त्यांच्यात प्रभागातून बिनविरोध झालेले विशाल राजूमामा भोळे, दिपमाला काळे व अंकिता पाटील सक्रियपणे मैदानात उतरून आपली ताकद दाखवली. रॅली दरम्यान विविध सोसायट्यांमध्ये स्थानिक महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून आणि पुष्पहार अर्पण करून जंगी स्वागत केले. रॅलीमध्ये तरुणांचा मोठा सहभाग आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.प्रचारादरम्यान मतदारांशी थेट संवाद साधताना अत्तरदे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले.

रस्ते, पाणी आणि स्वच्छता हे आमचे मुख्य अजेंडे आहेत. केंद्रातील आणि राज्यातील योजना थेट प्रभागातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मतदारांचा हा उत्साह पाहता आमचा विजय निश्चित आहे, असे चंद्रशेखर अत्तरदे यांनी सांगितले. “प्रभागाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी भाजप हाच एकमेव सक्षम पर्याय आहे,” असा विश्वास यावेळी मतदारांनी व्यक्त केला. या रॅलीत चेतन तिवारी, मयूर भोळे, पंकज पाटील, मनोज काळे यांच्यासह पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.





