Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । जळगावात चोरीचे सत्र सुरूच असून रोजच चोरीचे लहान मोठे व्रत समोर येत आहेत. गेल्या महिन्यातच कार चोरी झाल्याचे व्रत समोर आले होते. काल सोमवारी २२ रोजी दुचाकीसह कार चोरी झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रामांनदनगर पोलिसांत अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित प्रकाश कुकरेजा (वय ३०, रा. दत्तकृपा अपार्टमेंटच्या मागे, आदर्श नगर, जळगाव) यांनी रामांनदनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली. कुकरेजा हे कपडाचा व्यापार करून आपले उदरनिर्वाह करतात. दि.१९ ते २२ रोजी दरम्यान, कुकरेजा यांच्या मालकीची १ लाख २९ हजार रुपये किमतीची कार (क्र.एमएच १९ सीएफ ४२२५) कुणी तरी अज्ञात भामट्याने चोरून नेली. याबाबत कुकरेजा यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय खैरे करत आहेत.
अक्षय हिरालाल पाटील (वय २७, रा. अहुजा नगर निमखेडी शिवार, जळगाव) पाटील हे म.रा.वि.वि. कंपनीत नोकरीला आहेत. त्यांच्या मालकीची २० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम एच १९ सी के ९०९२) ची कुणी तरी अज्ञात भामट्याने चोरून नेली. या प्रकरणी पाटील यांनी दि. जळगाव तालुका पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रकाश चिचोरे करत आहेत.