डों.कठोरा ग्रा.पं.च्या दुर्लक्ष ; कोरड्या विहीरीमुळे नागरीकांचा जीव धोक्यात

जून 12, 2021 6:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील बेघर वस्तीच्या रहिवासी परिसरात असलेल्या कोरड्या व पडक्या विहीरीमुळे नागरीकांच्या जिवास धोका निर्माण झाला. या गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरीकांना केली आहे.

dongar kathora

या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की , डोंगर कठोरा तालुका यावल या गावातील ग्राम पंचायतच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या बेघर वस्तीच्या रहिवास क्षेत्रात मागील १५ वर्षापासुन काही कुटुंब राहात असुन, याच ठीकाणी लोकवस्तीच्या अगदी जवळ मध्यभागी असलेली अत्यंत जुनी कोरडी विहीर असुन, मागील काही दिवसांपासुन ही अत्यंत खोल असलेली कोरडी विहीर खालील भागापासुन सतत कोसळत असल्याने तात्काळ तिला बुजावी अन्यथा या क्षेत्रात राहणाऱ्या नागरीकांच्या जिवीतास धोका आहे.

या क्षेत्रात राहणारे नागरीकांमध्ये आपल्या लहान मुलं बाळासह कुटुंबाच्या सुरक्षेच्या विषया वरून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या क्षेत्रात राहणाऱ्या नागरीकांनी या विषयी डोंगर कठोरा ग्रामपंचायती कडे वारंवार तक्रारी केल्या. पंचायतीचे या गंभीर प्रश्नाकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत असुन या ठिकाणी विहीरीच्या आजुबाजुस राहणाऱ्या नागरीकांच्या विषया नेहमीच उडवाउडवीचे व वेळ काढुन जाण्याचे उत्तर नागरीकांना मिळत आहे.

यावेळी पावसाळ्यात सदरची विहीर कोसळुन झालेल्या अप्रीय घटनेस पुर्ण जबाबदार डोंगर कोठारा ग्राम पंचायत असेल अशा स्वरूपाची लिखित तक्रार यावल पंचायत सामितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे करण्यात येणार असल्याची माहीती परिसरातील राहणाऱ्या नागरीकांनी सांगीतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now