जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. केंद्रिय ओद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच सीआयएसएफ (CISF) मध्ये भरती निघाली असून यासाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीबाबत CISF च्या अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.

सीआयएसएफने हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर केली आहे. विशेष बारावी पास तरुणांसाठी ही मोठी संधी ठरू शकते. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
कोण अर्ज करू शकतो?
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १२वी पास असणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी १८ ते २३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. त्यापेक्षा जास्त वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करु नयेत.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
अर्ज शुल्क : या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही.
किती पगार मिळेल? या नोकरीसाठी तुम्हाला लेव्हल ४ नुसार २५००० ते ८१,१०० रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करावेत.
सीआयएसएफमधील या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना महत्त्वाची माहिती भरायची आहे. त्याचसोबत कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
१२वी पास तरुणांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे. सरकारी विभागात काम करायची संधी तुम्हाला मिळणार आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. सीआयएसएफमधील या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा.
12 paas art
12 paas science