चोपड्यातील अट्टल चोरट्याच्या अंकलेश्वरमधून आवळल्या मुसक्या

डिसेंबर 23, 2025 4:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सातत्यानं घरफोडी, वाहनचोरीच्या घटना समोर येत आहे. याच दरम्यान, अमळनेर शहरात विविध दुकाने फोडणाऱ्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी अंकलेश्वर येथून अटक केली आहे. प्रशांत जगन वालडे (मूळ रा. गोरगावले ता. चोपडा व हल्ली मुक्काम अंकलेश्वर गुजरात) असं अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहे

crime 26 jpg webp

शहरातील मध्यवस्तीत बाजारपेठेत नुकतीच चार ते पाच दुकाने पत्रा कापून, शेड कापून फोडण्यात आली होती. त्यातील वस्तू महागडा ऐवज व रोख रक्कम चोरीस गेल्याने शहरात खळबळ माजली होती. या चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी दुकानदारांकडून होत होती. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यांना एक संशयित चोरी करताना आढळला. त्याचा चेहरा पाहिला असता तो प्रशांत जगन वालडे असा आढळून आला.

Advertisements

त्याने पाने यापूर्वी देखील अनेक चोऱ्या केल्या असून चोरी करण्यात त्याचा हातखंडा होता. त्याच्या अटकेमुळे शहरातील चोऱ्या व घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिस निरीक्षक निकम यांनी प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, गणेश पाटील, निलेश मोरे, नितीन मनोरे, विनोद संदानशीव या पोलिसांच्या पथकाला अंकलेश्वर येथे चोरांचा शोध घेण्यासाठी पाठवले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रशांत वालडे याचा मागोवा घेत पोलिसांनी त्याला अंकलेश्वर येथून ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी मिळाली.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now