15 हजाराची लाच घेताना सहाय्यक फौजदाराला एसीबीने रंगेहात पकडले

ऑगस्ट 25, 2023 3:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२३ । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार वाढत चालल्याचे दिसतेय. अशातच चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचा सहाय्यक फौजदार १५ हजारांची लाच घेताना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. शिवाजी ढगू बाविस्कर (वय-५२) असं लाचखोराचे नाव असून या कारवाईमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

lach jpg webp

नेमका प्रकार काय?
२३ ऑगस्ट रोजी धुळे जिह्यातील रहिवाशी असलेले तक्रारदार हे त्यांचा भाऊ आणि त्याचा मित्र असे दोघे दुचाकीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लासून गावाजवळून जात आसतांना चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार शिवाजी ढगू बाविस्कर त्यांना अडवत तुमच्याजवळ गांजा आहे. गांजाची केस आणि दुचाकी सोडवायची असेल तर प्रत्येक ७५ हजार असे एकुण दीड लाख रूपयांची मागणी केली

Advertisements

तडजोडीअंत पहाटे ४ वाजता तक्रारदारच्या नातेवाईकांकडून सुरूवातील ३० हजार रूपये घेतले. त्यानंतर दुचाकी ठेवून घेतली. दुचाकी सोडवायची असल्यास पुन्हा २० हजार रूपये द्यावे लागतील अशी मागणी सहाय्यक फौजदार बाविस्कर यांनी केली. त्यानंतर तडजोडी अंती १५ हजार रूपये देण्याचे ठरविले. तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाला तक्रार दिली.

Advertisements

त्यानुसार लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन,.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे,पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर. पो.कॉ.सचिन चाटे यांनी चोपडा शहरात सापळा रचला. यावेळी तक्रारदार कडून १५ हजार रूपये घेतांना सहाय्यक फौजदाराला अटक केली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now