चोपडा हादरले ! काठीने मारहाण करत दगडाने ठेचून इसमाचा खून

मे 25, 2025 10:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२५ । जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात ४५ वर्षीय इसमाला काठीने मारहाण करून दगडाने ठेचून त्याचा खून केला.राजेश काशीराम बारेला असे मृत इसमाचे नाव असून ही घटना २४ रोजी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास पंचायत समिती सभापती निवास समोर घडली. याप्रकरणी

chopda khun

यातील संशयित आरोपी राजेश काशीराम बारेला आणि जाणू राजू बारेला (वय ३५) हे दोघेजण चोपडा शहरात सकाळी भंगार आणि बाटल्या गोळा करतात व दिवसा दारू पितात. दिवसभर काम करून रात्री सोबत अल्पबचत भवनच्या पायऱ्यांवर झोपत होते. हे दोन्ही सोबत राहत होते मात्र ते पती पत्नी नव्हते असे पोलिसांनी सांगितले. मात्र आरोपी म्हणतो ती माझी बायको आहे. तर तिने नाकारले.

Advertisements

२३ रोजी जानू बारेला आणि अज्ञात मृत इसम हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात फिरताना कॅमेराध्ये दिसून आला आहे. आरोपी हा रात्री जेव्हा चोपडामधील अल्पबचत भवन जवळ नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी आला तेव्हा जाणू बारेलाशी एक जण शरीर संबंध करताना दिसून आला. त्यामुळे संतप्त झालेल्या राजेश बारेला याने त्या ४५ वर्षीय अज्ञात इसमाला काठीने बेदम मारहाण केली आणि शेवटी त्याच्या डोक्यात दगड टाकून मारून टाकले. सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Advertisements

लागलीच एकूण सात पथके वेगवेगळ्या ठिकाणी रावण केली होती. त्यात आरोपीला हा पंचायत समिती समोरच्या सीसीटीव्हीत पहाटे दोन वाजता बाहेर पडताना दिसल्याने काही तासातच पोलिसांनी गोरगावले रोडवर फिरताना पकडले. घटनास्थळी सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय जितेंद्र वल्टे, एकनाथ भिसे, पोलिस कर्मचारी संतोष पारधी, निलेश वाघ, रितेश चौधरी, मदन पावरा आदी उपस्थित होते. मृताची पोलिसांना अद्याप ओळख पटलेली नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment