---Advertisement---
राजकारण यावल

चितोडा गावाचा कारभारी ठरला! अरुण पाटील सरपंच पदी विजयी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२२ । मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर चितोडा ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत सरपंचपदासाठी रिंगणात असलेल्या अरुण पाटील यांनी बाजी मारली आहे. अरुण पाटील यांना ३४३ मते मिळाली.

arun patil jpg webp webp

चितोडा ग्रामपंचायतीमध्ये आधीच ७ सदस्य बिनविरोध निवडणूक आले. तर दोन सदस्य पदासाठी पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर यंदा सरपंच पदासाठी चार उमेदवार रिंगणात उतरले होते. या निवडणुकीसाठीचे मतदान रविवारी पार पडलं होते. यात सरासरी जवळपास ८५ टक्के मतदान झालं.

---Advertisement---

दरम्यान, आज या निवडणुकीची मतमोजणी होणार असल्याने गावचा सरपंच कोण होणार हे ठरणार होते. आता निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यात सरपंचपदासाठी रिंगणात असलेल्या अरुण पाटील यांनी बाजी मारली आहे. अरुण पाटील यांना ३४३ मते मिळाली. तर वार्ड एक मध्ये योगेश भंगाळे हे सदस्यपदी विजयी झाले आहे. त्यांनी सागर पाटील यांचा पराभव केला. तर वार्ड २ मध्ये चंद्रकांत जंगले विजयी झाले आहे.

गावाच्या विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवत अरुण पाटील हा युवक थेट सरपंच पदासाठी रिंगणात उतरला होता. यंदाच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी दोन तरुण चेहरे रिंगणात होते. दरम्यान, मागील गेल्या अनेक वर्षात विकासाच्या नावावर ग्रामस्थांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम झाले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत गावकऱ्यांनी तरुण आणि नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे.

सरपंच पदासाठी रिंगणात असलेल्या कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली?
अरुण पाटील – ३४३
उमेश कुरकुरे – १७७
विलास धांडे – ३१५
सुवर्णा पाटील – ३००

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---